गौतमी पाटीलला कोकणात नो एन्ट्री

banner 468x60

कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान विरोध झाला होता. त्यानंतर आता कोकणातील सिंधुदुर्गमध्ये आयोजित गौतमीच्या लावणीचा शो देखील आता रद्द करण्यात आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy


Gautami Patil Kokan Show Cancel: आपल्या अदांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचं नाव सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे.

मात्र, आता गौतमीला अनेक ठिकाणांहून विरोध होताना दिसत आहे. कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान विरोध झाला होता. त्यानंतर आता कोकणातील सिंधुदुर्गमध्ये आयोजित गौतमीच्या लावणीचा शो देखील आता रद्द करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या लावणीचे डीजे शो आयोजित करण्यात आले होते. याचे पोस्टर देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र, आता अचानक तिचे शो रद्द करण्यात आले आहेत.

भगवान परशुरामाच्या पावन भूमीत असा कार्यक्रम होऊ देणार नाही, असं म्हणत अनेकांनी विरोध दर्शवला आहे. यानंतर आता तांत्रिक कारणं देत गौतमी पाटीलचा शो रद्द केल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

यानंतर आता अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केल्याचे म्हटले आहे. तर, गौतमी पाटीलच्या काही चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी नुकतेच जाहीर केले आहे की, गौतमीचा सदरचा कार्यक्रम काही तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे.

येत्या ७ व ८ ऑक्टोबरला कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमी पाटील लावणी आणि डीजे शो आयोजित करण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

मात्र, गौतमी पाटीलचा कार्यक्रम जरी रद्द झाला असला, तरी याच दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला ‘कॉमेडीचे सुपरस्टार’ हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’तील कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. आता या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, त्या देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *