दापोली :नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे पालक शिक्षक संघ स्थापन

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे पालक शिक्षक संघाच्या सर्व साधारण सभा शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम यांच्याअध्यक्षतेखाली झाली.

अनस मुजावर याने कुराण पठण केले. शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी पाहुण्याचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले.

प्रास्ताविकात पालक शिक्षक संघाचा उद्देश, नियम, महाराष्ट्र शासनाचे विविध परिपत्रक लोकांना समजावून सांगीतले. सन 2024/25 करिता सर्वानुमते पालक शिक्षक संघाची पुनर्रचना करण्यात आली.

यात अध्यक्ष: फैयाज सर ( मुख्याध्यापक) उपाध्यक्ष: मेहबूब हाशीम मुकादम (पालक) सचिव: परकार अरशद दाऊद (शिक्षक) सहसचिव: निगार फैयाज अहमद वलेले (पालक) सदस्य: 1)नाझीमा इनायत फकी (पालक)2)जीनत इरफान मुकादम (पालक) 3) अब्दुल कादीर जमादार (शिक्षक) 4) उमर अब्बास मुजावर ( पालक) 5) फहीमा अझीम जुवळे ( शिक्षक) 6) आसीया मोहम्मद हुसैन मुकादम (पालक) 7) मजहर इब्राहिम दिवेकर (पालक)8) रमीजा अब्दुल वहाब अलवारे(पालक)9) मुन्नवर हाशम मुकादम (पालक) नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.

शालेय समिती सदस्य गुलाम हुसैन भारदे यांनी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी चे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात नूर मोहम्मद मुकादम यांनी शाळेच्या यशाबद्दल कौतुक केले.

सभेचे सूत्रसंचालन जमादार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेबददल संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे यांनी अभिनंदन केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *