दापोली : रामराजे ज्यु. कॉलेजच्या चौदा विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

दापोली : रामराजे ज्यु. कॉलेजच्या चौदा विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

banner 468x60

क्रीडा युवक व सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व दापोली तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दापोली तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर नुकत्याच पार पडल्या.

या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये रामराजे ज्यु.कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोलीच्या एकूण 14 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

यामध्ये 19 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये 3000 मीटर धावणे प्रथम- ऋषिकेश रेवाळे, द्वितीय-स्मित काष्टे,लांब उडी प्रथम- विवेक पाचकले, थाळीफेक तृतीय- रितेश जावळे, 200 मीटर धावणे तृतीय -सागर मोहिते, 800 मीटर धावणे तृतीय- हर्षद नितोरे,1500 मीटर धावणे तृतीय- हर्ष उजाळ ,क्रॉस कंट्री प्रथम -ऋषिकेश रेवाळे, द्वितीय- सुजल लोखंडे आणि 5 किमी.

चालणे प्रथम- स्मित काष्टे.
तसेच 19 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये 3000 मीटर धावणे, क्रॉस कंट्री व हातोडा फेक प्रथम -अनुश्री आंबेकर, 200 मीटर धावणे व गोळा फेक प्रथम-श्रावणी साळवी 800 मीटर धावणे द्वितीय सलोली निवळकर, 400 मीटर धावणे प्रथम- शितल खळे, थाळीफेक प्रथम- नंदिनी सणस, 200 मीटर धावणे द्वितीय- गायत्री जोशी, हातोडा फेक

द्वितीय- स्वरूपा पालकर,4× 400 रिले प्रथम ,100 मीटर धावणे तृतीय- ऋतुजा माने, लांब उडी तृतीय- नंदिनी सणस हे सर्व विद्यार्थी विजयी झाले.

या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संतोष येसावरे, प्राचार्या वेदिका राणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, सेक्रेटरी डॉ. सुष्मिता राजपुरे ,सर्व संचालक मंडळ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांनी विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *