गुहागर : चिवेली फाटा येथे भाजपाच्या वतीने उद्यापासून चाकरमान्यांसाठी चहा नाश्ता वाटप

banner 468x60

गणेश उत्सवासाठी मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावाला येतात. काही एसटी महामंडळाच्या गाडीतून तर काही खाजगी गाड्या करून येत असतात.

banner 728x90

अशावेळी वाहतूक कोंडीमुळे त्यांना खूप तासांचा प्रवास करावा लागतो. यासाठीच भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभेच्या आणि माजी आ. डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ ते ७ सप्टेंबर पर्यंत चिवेली फाटा घोणसरे येथे सर्व चाकरमानी व प्रवाशांसाठी चहा नाष्टा वाटप दिवस रात्र करण्यात येणार आहे.

यासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.कोकणात गणेशोत्सवाला बहुसंख्य चाकरमानी गावी येतात. त्यामुळे एरवी सामसूम असलेली गावे माणसांनी भरून जातात. मात्र, गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस खूपच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आठ तासा ऐवजी १२ ते १५ तास सुद्धा प्रवास करून आपल्या गावी पोहोचावे लागते.

यादरम्यान त्यांना पाणी किंवा इतर गोष्टींची उपलब्ध होणे गरजेचे असते. हा सेवाभावी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून चिपळूण -गुहागर मार्गावरील चिवेलीफाटा येथे भाजपा कार्यकर्ते स्वतः चाकरमान्यांसाठी दिनांक ५ ते ७ सप्टेंबर पर्यंत दिवस रात्र चहा नाश्ता वाटप करणार आहेत.


खास भाजपा गुहागर विधानसभेच्या माध्यमांतून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. जेणेकरून गावाकडे येणाऱ्या चाकरमानी यांना या ठिकाणी थोडा विसावा मिळावा आणि चहा नाष्टा याचा स्वाद घेता यावा यासाठी भाजपाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या सेवेचा चाकरमान्यांनी लाभ घ्यावा, असे भाजपा गुहागर विधानसभेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *