दापोली : निवडणुकीसाठी उभे राहिले, डिपॉजिट जप्त झाले, नऊ पैकी सात उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

banner 468x60

दापोली मतदार संघात सात उमेदवारांचे डिपॉजिट कायद्यानुरार जप्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दापोली डाॅ अजित थोरबोले यांनी दिली.२६३ दापोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.२३ नोव्हेंबर २४ रोजी पार पडली आहे.

त्यानुषंगाने उपोद्घातातील अ.क्र. 1 अन्वये ज्या मतदार संघामध्ये मतदान झाले आहे अशा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास मिळालेली वैध मते ही सदर निवडणूकीमधील एकूण वैध मतांच्या एक एक षष्टांशपेक्षा कमी असल्यास अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाईल अशी तरतुद आहे.

उपोद्घातातील अ.क्र. 2 कडील निकाल पाहता, एकूण वैध मताची संख्या ही १९६९३९ असून, एक षष्टांश मते ३२८२३ होत आहे. २६३ दापोली विधानसभा मतदार संघामध्ये मतमोजणीमध्ये खालील सात उमेदवारांना मिळालेली वैध मते ही ३२८२३ पेक्षा कमी आहेत.


मिळालेली वैध मतेअबगुल संतोष सोनू : ४९६०
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
मर्चंडे प्रविण सहदेव : १८१६(बहुजन समाज पार्टी)
कदम योगेश रामदास : ३५५
(अपक्ष)
कदम योगेश विठठल : १५४ (अपक्ष)
कदम संजय सिताराम : ७१३(अपक्ष)
कदम संजय संभाजी : ९४७
अपक्ष
खांबे ज्ञानदेव रामचंद्र : ९५६ अपक्ष
वरील उमेदवार यांना मिळालेली मते ही एकूण वैध मतांच्या (१९६९३९) एक षष्ठांश (३२८२३) पेक्षा कमी असल्याने सदर उमेदवार यांची अनामत रक्कम, डॉ. अजित थोरबोले, निवडणूक निर्णय अधिकारी, २६३- दापोली विधानसभा मतदारसंघ यांनी मिळालेल्या अधिकारानुसार जप्त केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *