Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोलीत 10 ते 14 ऑक्टोबर ‘स्वामी भव्य ग्राहक पेठ’ – महिला व लघु उद्योजकांचा उपक्रम

banner 468x60

दापोली : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिला व लघु उद्योजकांनी दापोलीत “स्वामी भव्य ग्राहक पेठ” या अनोख्या प्रदर्शन-विक्री मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा १० ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या शैक्षणिक संग्रहालयात भरविण्यात येणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

banner 728x90 banner 728x90

या ग्राहक पेठेत स्थानिक हातकला, पारंपरिक कला, तसेच घरगुती उत्पादनांना विशेष स्थान देण्यात आले आहे. सावंतवाडी लाकडी खेळणी, मातीच्या वस्तू, ज्यूटच्या ओटीच्या पिशव्या, साड्या, ड्रेस, गोधडी, सोलापुरी चादरी, बेडशीट, ब्लॅंकेट, टॉवेल, घरगुती मसाले, गायीचे तूप, मोदक, दिवाळी फराळ, तसेच पारंपरिक मराठी दागिने, मातीच्या पणत्या, कंदील आणि रांगोळीचे साहित्य असे विविध आकर्षक स्टॉल्स येथे उपलब्ध असणार आहेत.

यासोबतच कोकणी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स नागरिकांना चविष्ट अनुभव देणार आहेत. या उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादक व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

‘स्वामी भव्य ग्राहक पेठ’ ही केवळ विक्रीपेठ नसून, कोकणातील स्थानिक हातकलेचा, परंपरेचा आणि उद्योजकतेचा उत्सव ठरणार आहे.
दिवाळीची खरेदी, एकाच ठिकाणी – दापोलीतच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *