दापोलीचे सुपुत्र ओंकार कोळेकर शरीर सौष्ठव स्पर्धेचे “रत्नागिरी श्री उदय ” 2025 चे मानकरी

banner 468x60

आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी कावीळतळी चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने निवड चाचणी स्पर्धा 2025 नुकतीच पार पडली ह्या स्पर्ध साठी जिल्हाभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.


रत्नागिरी श्री उदय 2025 किताबाचे मानकरी ओंकार कोळेकर ठरले यांना आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू नंदकिशोर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले. तर रत्नागिरी श्री मास्टर 2025 चे विजेते प्रवीण कांगणे यांनी किताब पटकावला विशेष म्हणजे ओमकार फिटनेस अनेकांना विविध पदक पटकावली आहेत .

banner 728x90

स्पर्धेतील इतर विजेत्यां मध्ये गव्हे गावचे सुपुत्र कु.मानव मनोज गुरव यांनी ग्रुप पहिला मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे . राहुल रघुनाथ जोशी, कल्पेश महादेव पवार बुरोंडी गावचे सुपुत्र मारुफ मुबिद चेलकर यांनी रत्नागिरी श्री मध्ये ग्रुप प्रथम मध्ये पाचवा क्रमांक उंबरले गावचे सुपुत्र अमित रमेश जाधव यांनी रत्नागिरी श्री ग्रुप तिसरा मध्ये तिसरा क्रमांक पटकवला आहे.

तसेच विनायक तळवटकर यांनी रत्नागिरी उदय ग्रुप 3 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला व अमन बरटवाळ यांनी ग्रुप 2 मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. हे सर्व खेळाडू दापोली मधल्या ओंकार फिटनेस ह्या जिममध्ये आपल्या शरीरयष्टी बनवतात यांना जिम चे मालक व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या गोल्डस जिम ह्या कडून सर्टिफाइड असलेले ओंकार कोळेकर यांचे

मार्गदर्शन असते दापोलीकराना चांगले आरोग्याच्या दृष्टीने आपल्या जिम च्या माध्यमातून चांगली शरिर यष्टी करण्याचा त्यांच्या मानस आहे . कोल्हापूर येथेल राज्य स्पर्धे साठी यांची निवड झाली आहे सर्व विजेत्या बद्दल स्थानिक त्यांचा गौरव करत आहेत व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *