दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचालित यु.के. पब्लिक स्कूल, दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत एक आगळावेगळा उपक्रम राबवला. देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी राख्या तयार केल्या.

या राख्यांसोबतच विद्यार्थ्यांनी जवानांप्रती आणि पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रेही लिहिली. या पत्रांमध्ये त्यांनी जवानांच्या आणि पोलिसांच्या त्यागाबद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. तयार करण्यात आलेल्या या राख्या आणि पत्रे जवान आणि पोलिसांना पाठवण्यात येणार आहेत.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.अब्दुल करीम गैबी, मुख्याध्यापिका.मारिया अझर सारंग आणि सानिया शेख उपस्थित होत्या.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















