दापोली : युवकाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथे १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका ४२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


उदय गजानन तांबटकर (वय ४२, रा. वेळवी कलानगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे तांबटकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उदय तांबटकर यांनी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत राहत्या घरात लोखंडी बारला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.


रुग्णालयातून रात्री ८ वाजून ५४ मिनिटांनी पोलिसांना माहिती मिळाली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *