दापोली : योगेश कदमांचा ऑपरेशन टायगर, नगरपंचायतीच्या विशेष समिती निवडणुकीत महायुतीचा विजय

banner 468x60

दापोलीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑपरेशन टायगरच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. दापोली नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक आज 21 फेब्रुवारी रोजी बिनविरोध पार पडली असून या निवडणूकीत ठाकरे गटाच्या एकाही नगरसेवकाने आपला अर्ज सादर केला नाही.

banner 728x90

याशिवाय हे सर्व नगरसेवक संपूर्ण प्रक्रियेवेळी उपस्थित न राहिल्याने दापोलीत आश्चर्य व्यक्त केले जात असून शिवसेनेच्या वतीने दापोली नगरपंचायतीत लवकरच सत्ताबदल होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


उबाठा नगरसेवक मागील वर्षी प्रमाणे याहीवर्षी गैरहजर राहिले होते. दापोली नगरपंचायतीमध्ये 17 नगरसेवक असून यामध्ये सध्या उबाठा गटाकडे 8, शिवसेनेकडे 5 व 2 अपक्ष असे 7, राष्ट्रवादी 1, भाजप 1 असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे उबाठा गटाचे असल्याने त्यांना 2 समित्या या पदसिध्द मिळणार होत्या.

तर संख्याबळानुसार आणखी 2 समित्या या उबाठाकडे आल्या असत्या. मोरे ममता बिपीन या स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करतील, रखांगे खालीद अब्दुल्ला उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. साळवी जया अजय, शिके प्रिती सतीश आणि लांजेकर अश्विनी अमोल हे इतर सदस्य आहेत.


सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये रखांगे खालीद अब्दुल्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर तळघरकर महबूब कमरूद्दीन, शिगवण विलास राजाराम, खानविलकर शिवानी सुरेश आणि चिपळूणकर अझीम महंमद हे या समितीचे सदस्य आहेत.

स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये साळवी जया अजय या समितीच्या अध्यक्ष आहेत. रखांगे अन्वर अब्दुल गफूर, कळकुटके संतोष दत्ताराम, घाग कृपा शशांक आणि खानविलकर शिवानी सुरेश हे सदस्य म्हणून काम करतील.


पाणीपुरवठा समिती सभापती शिवसेना प्रीती सतीश शिर्के या काम पाहतील

पाणीपुरवठा व जलनिःसारण समितीमध्ये प्रिती शिर्के या सभापती तर अन्वर रखांगे, विलास शिगवण, शिवानी खानविलकर, कृपा घाग हे सदस्य आहेत. महिला व बालकल्याण समितीमध्ये अश्विनी लांजेकर या सभापती शिवानी खानविलकर उपसभापती, कृपा घाग, मेहबूब तलघरकर हे सदस्य आहेत.



या निवडीनंतर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *