दापोली : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळेप्रकरणी संशयितास जामीन मंजूर

banner 468x60

दापोली येथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सुनील यशवंत शिंदे (रा. बांधतिवरे-दापोली) या संशयितास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

banner 728x90 banner 728x90

संशयिताच्यावतीने ऍड. स्वरूप थरवळ यांनी युक्तीवाद केला.पीडित अल्पवयीन बालिकेचा संशयिताने पाठलाग करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत घरी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत तिच्या पालकांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याच्यावतीने ऍड. थरवळ यांनी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असता काही अटी व शर्थीवर संशयितास जामीन मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *