दापोली : उद्यापासून उडाण सर्व्हिसेस अँड इव्हेंटस् आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन

banner 468x60

7 फेब्रुवारीपासून दापोलीत उडाण महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. उडाण सर्व्हिसेस अँड इव्हेंटस् आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची तयारी सध्या आझाद मैदानात सुरू आहे.

कार्यक्रम पुढील प्रमाणे –
दापोली महसंस्कृती महोत्सव टाईमटेबल – 2025
०७ फेब्रुवारी – उद्घाटन, ओपनिंग
०८ फेब्रुवारी – दापोली आयडॉलस्
०९ फेब्रुवारी – लकी ड्रॉ, किड्स फॅन्सी ड्रेस
१० फेब्रुवारी – कुकिंग कॉम्पिटेशन
११ फेब्रुवारी – रांगोळी कॉम्पिटेशन
१२ फेब्रुवारी – फॅशन शो
१३ फेब्रुवारी – डान्स कॉम्पिटेशन
१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन स्पेशल गेम
१५ फेब्रुवारी – बॉडीबिल्डिंग कॉम्पिटेशन
१६ फेब्रुवारी – होम मिनिस्टर
१७ फेब्रुवारी – सेल्फी, रिल्स, प्राईज डीस्ट्री, समारोप

banner 728x90

कोकण प्रदेशाच्या विकासासाठी आणि परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी उडाण सर्व्हिसेस अँड इव्हेंटस्ने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. दापोलीला संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून दापोलीच्या संस्कृतीचं प्रदर्शन झालंच आहे मात्र पुन्हा एकदा आपल्याच दापोलीत उडाण महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 फेब्रुवारीपासून आपल्या दापोलीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणात पर्यटकांचा ओघ वाढावा, तसंच स्थानिक रोजगाराला चालना मिळावी, दापोलीच्या संस्कृतीचं प्रदर्शन होणं यासाठी या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी आयोजन करण्यात येईल.

कोकणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कोकणातील ग्रामीण भागातील कलाकार आपापल्या भागातील लोककलांचे प्रदर्शन करणार आहेत. कलासक्त कोकणातील कला दालन, खाद्य महोत्सव हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे

दापोली महासंस्कृती महोत्सवात फन फेअर, महाबचत कंजूमर शॉपिंग, फूड स्टॉल्स , येणाऱ्या रसिकांसाठी दररोज विविध करमणुकीचे कार्यक्रम आणि आकर्षक बक्षिसे , भव्य पुरस्कार सोहळा, पाककला स्पर्धा, उडाण रील व सेल्फी स्पर्धा , महिलांसाठी होम मिनिस्टर , संगीत खुर्ची , फॅशन शो, रेकॉर्ड डान्स आणि बरच काही असणार आहे. दरम्यान विशेष आकर्षण 14 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन्स स्पेशल असणार आहे.

उडाण महासंस्कृती महोत्सवात इयत्ता 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असेल मात्र ओळखपत्र असणं बंधनकारक असेल. इतरांना अगदी नाममात्र प्रवेश शुक्ल असेल.

उडाण महासंस्कृती महोत्सवा६ ते 17 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. वेळ: सायं. 6 ते 10 स्थळ आपल्या आझाद मैदान दापोली येथे असणार आहे. दररोज 2 लकी ड्रॉ सहा ते आठ एक लकी ड्रॉ आणि आठ ते दहा दुसरा लकी ड्रॉ दिवसातून दोन बक्षिसे असणार आहे.

या कालावधीत होणार उडाण महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन : 7 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. वेळ: सायं. 6 ते 10 स्थळ आपल्या आझाद मैदानात

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *