दापोली तालुक्यातील करंजाळी येथील एका बंद घरातून घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेणार्या एका तरूणास दापोली पोलिसांनी मोठया शिताफीने मुंबई नागपाडा येथून ताब्यात घेतले.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास करंजाळी येथून संशयित सुनिल मोहन मोरे, वय ४२, रा. वसई याने फिर्यादीचे राहत्या घरातील बेडरूममध्ये किचनच्या भिंतीवरून प्रवेश करून बेडरूममध्ये कोणीही नसल्याचे फायदा घेत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.
संशयिताचा दापोली पोलिस शोध घेत असताना त्यांना त्याच्या मोबाईलचे लोकेशन मुंबई येथे असल्याचे निदर्शनास आले. दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिजीत पवार, पोलिस कॉन्स्टेबल सुहास पाटील, विजय सातर्डेकर यांनी लागलीच मुंबई येथे जावून संशयित आरोपीचा शिताफीने शोध घेत त्याला नागपाडा येथून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केल्याने त्याला रविवार दि. २३ मार्च रोजी दापोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. संशयित सुनिल मोरे याच्यावर दापोली पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर ५२/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला माल दापोली पोलिसांनी हस्तगत करून संशयित सुनिल मोरे याला सोमवार दि. २४ मार्च रोजी दापोली न्यायालयात हजर केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















