दापोली : थंडीची हुडहुडी, पारा 8.8 अंशावर

banner 468x60

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दापोलीत आज थंडीचा पारा 8.8 अंश इतका खाली घसरल्याने दापोलीकरांना थंडीची चांगलीच हुडहुडी भरली.

दापोली तालुक्यात यावर्षीच्या हंगामात शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी 8.8 अंश ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

ऑक्टोबर हीटनंतर 21 नोव्हेंबरपासूनच तापमानात घसरण होऊन थंडीचा पारा दररोज खाली उतरत चालल्याने दापोलीकरांना थंडीची हूडहूडी भरू लागली आहे. त्यामुळे गरम स्वेटर आणि पांघरूण खरेदीसाठी लोक कपड्यांच्या दुकानात गर्दी करु लागले आहेत.

तर अनेक ठिकाणी शेकोटया देखील पेटू लागल्या आहेत. दापोली येथील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात आज शनिवारी 30 रोजी 8.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झाली आहे. लोकांना थंडीची हुडहुडी भरत असली तरी आंबा काजू मोहरण्यासाठी थंडीचे वातावरण पोषक असल्याने फळबागायतदार मात्र चांगलेच खुशीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *