दापोली : शिक्षक संघ दापोली मार्फत विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन

banner 468x60

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा दापोलीच्या वतीने दापोली येथील श्री मंगल कार्यालयात नुकतेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघ दापोलीचे अध्यक्ष संदीप जालगांवकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

banner 728x90


गेल्या शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, शाळा, मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, नासा-इस्रो भेट स्पर्धा, व्हिजन दापोली, आर टी एस परीक्षा, पंचायत समिती दापोलीकडून निवड झालेले आदर्श शिक्षक पुरस्कार, गेल्या शैक्षणिक वर्षांत सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठीच्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे, राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम, रत्नागिरी जिल्हा सचिव संतोष रावणंग, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश कडवईकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र रणसे, राष्ट्रीय प्रवक्ते जीवन सुर्वे,

राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन नावडकर, दापोली तालुका सचिव गणेश तांबिटकर, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक चंद्रकांत झगडे, मनीष शिंदे, पतपेढी उपाध्यक्ष अरविंद पालकर, दापोली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकरी सुधाकर गायकवाड तालुका महिला आघाडी अध्यक्ष नम्रता चिंचघरकर, अश्विनी मोरे, मधुरा सोमण, मंडणगड तालुका सचिव अशोक सुर्वे, कार्याध्यक्ष सोमनाथ फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष भिकू बोर्ले, कार्याध्यक्ष अनंत सुतार, चिपळूण तालुका सचिव सुनील चव्हाण, कोषाध्यक्ष अजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.


शिक्षक संघ दापोली आयोजित या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुर नार्वेकर यांनी केले तर सचिन नावडकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघ दापोलीच्या पदाधिकारी व सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *