दापोली : उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी घेतली शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट, दापोलीत सत्ताबदल होणार ? रखांगे शिवसेनेत जाणार ?

banner 468x60

दापोली नगरपंचायतीमधील उबाठाचे 5 नगरसेवक मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान उपनगराध्यक्ष खालीद रखांगे हे देखिल शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा असतानाच रखांगे यांनी रामदास कदम यांची आपल्या समर्थकांसह भेट घेतली असल्याने दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहावयास मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

banner 728x90

आता खालीद रखांगे यांच्यासह कोण नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुळचे शिवसेनेचे असलेल्या खालीद रखांगे यांनी आपल्या राजकीय जीवनाला माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात केली.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली व राष्ट्रवादीतून ते नगरसेवकही झाले. त्यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. त्यानंतर माजी आमदार संजयराव कदम यांचे समर्थक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

व त्यांनी संजयराव कदम यांच्या प्रेमापोटी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूकीनंतर दापोली मतदार संघामध्ये फार मोठया प्रमाणात बदल होऊ लागले आहेत.

राज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांचा शपथविधी झाल्यावर दापोली मतदार संघात अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात जाऊ लागले असल्याचे चित्र तयार झाले होते.
त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले व त्यानंतर उबाठामध्ये प्रवेश केलेले पाच नगरसेवकांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसादिवशी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी लवकरच शिवसेनेचा भगवा नगरपंचायतीवर फडकेल असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसातच उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी आपले समर्थक अजिम चिपळूणकर, फिरोज गिलगिले, स्वीकृत नगरसेवक नादीर रखांगे, नगरसेविका रिया सावंत यांच्यासह शिवसेना नेते ना. रामदास कदम यांची भेट घेतली व विस्तृतपणे चर्चाही केली.

त्यानंतर या सर्वांचा प्रवेश हा शिवसेनेत होणार हे निश्चित झाले आहे.
दरम्यान नगराध्यक्ष ममता मोरे, नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, नगरसेवक

आरिफ मेमन हे नेमकी काय भूमिका घेणार हे समजू शकले नाही तसेच उबाठाचे आणखी कोण पदाधिकारी खालीद रखांगे यांच्यासमवेत शिवसेनेत जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *