दापोली : विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापकाची वेंगुर्ले येथे बदली

banner 468x60

दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. संबंधित प्राध्यापकाची सहयोगी प्राध्यापक पदावरून सहाय्यक प्राध्यापक पदावर पदानवती करण्यात आली असून त्यांची वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात बदली करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने १८ जुलै २०२५ रोजी विद्यापीठाच्या कुलगुरूंंकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाला तत्काळ निलंबित केले होते.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२५ रोजी त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने तपास पूर्ण करून नुकताच आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केला.

चौकशी अहवालात संबंधित प्राध्यापकाने आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून शिक्षक-विद्यार्थी या पवित्र नात्याला धक्का पोहोचवणारे कृत्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांनी कायदा व सेवा नियमांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचेही अहवालात म्हटले आहे. हे कृत्य शासकीय सेवेला अशोभनीय असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

या अहवालाच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकाची पदानवती करून त्यांची वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयात अधिक दक्षता बाळगण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *