दापोली : शुल्लक कारणातून फ्री स्टाईल राडा, मोबाईल फोडला, दरवाजा तोडला, 12 जणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील इनामपांगरी सुतारवाडी येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाल्या प्रकरणी सुमारे 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनीषा देवघरकर यांच्या घरात दिनांक 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक महिला तिच्या समवेत नवनीत संजय देवघरकर व नवनीत देवघरकर याची पत्नी हे तिघेजण मनीषा देवघरकर यांना लोखंडी सळई व चिरीव जाड चौकोनी लाकडाने मारहाण करून दुखापत केली.

नवनीत देवघरकर याने मनीषा हिचा सुमारे 21000 किमतीचा मोबाईल फोडला. घराच्या बाहेरील बाजूस संजय रामचंद्र देवघरकर, भागोजी पांडुरंग देवकर, सोबत 2 महिला तसेच जगदीश विश्राम देवघरकर चंद्रकांत गोविंद देवघरकर हे घराच्या बाहेर आले असता संजय देवघरकर याने मनीषा हिला मारण्यास सांगून कंपाउंडला लावलेले सिमेंटचे पत्रे व घराच्या दरवाजा लाथ मारून तोडला.

त्या ठिकाणी लावण्यात आलेला सुमारे 7 हजार किमतीचा कॅमेरा व त्याची चीप तोडून टाकली. भागोजी देवघरकर याने घराच्या कंपाऊंडचे सिमेंटचे पत्रे फोडले त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने कोर्टातील दावे परत घे असे सांगून मनीषा व तिच्या आईला काठीने मारहाण केली. तसेच जगदीश विश्राम देवघरकर याने मनीषा व तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली.

नवनीत देवघरकर हिचा कारभार कायमचा संपवून टाका असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारामारी मध्ये मनीषा यांचा कुर्ता व तिच्या आईची साडी फाडून नुकसान केले त्यावेळेला सुरेश गोविंद देवघरकर याने यांना ठार मारण्याची धमकी दिली.

I’m दापोली पोलीस स्थानकात सुमारे 12 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118 (1), 189 (2), 191 (2), 190,324 (4), 351 (2),329 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गंगधर करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *