दापोली : ज्येष्ठ साहित्यिक, लेखक माधव गवाणकर यांचे दहावे पुस्तक ‘चेटूक माऊ’ प्रकाशित

banner 468x60

दापोली रामराजे महाविद्यालय, दापोली येथील मास मीडिया विभागाचे प्राध्यापक तसेच ज्येष्ठ साहित्यिक माधव गवाणकर यांचे दहावे पुस्तक ‘चेटूक माऊ’ नुकतेच प्रकाशित झाले आहे.

गवाणकर यांच्या लेखनातून नेहमीच समाजातील अंधश्रद्धा, गैरसमज आणि बालमनातील भीती यांवर प्रकाश टाकला जातो. ‘चेटूक माऊ’ या नव्या पुस्तकात त्यांनी मुलांच्या मनातील काळ्या मांजरीबद्दलच्या अंधश्रद्धा आणि गैरसमजांना दूर करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.

गवाणकर यांच्या यापूर्वीच्या ‘नाट्यछटा, पिटुकल्या गोष्टी, झकास गावच्या गोष्टी, बलदंड बबडू’ या पुस्तकांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यांची ‘सालं लाईफ’ ही कादंबरीही वाचकप्रिय ठरली आहे. तसेच ‘नाट्यछटा, थट्टाछटा, ध धमाल’ हे नाट्यछटा संग्रह, ‘बोका बनला मामा’ ही विनोदी नाटिका आणि ‘चंदू आणि भोंदू’ या प्रयोगमूल्य बालकथा त्यांनी साकारल्या आहेत. त्यांनी बालसाहित्य लेखिका आशा गवाणकर यांचा साहित्यवारसा समर्थपणे पुढे नेला आहे.

‘चेटूक माऊ’ या कथासंग्रहात मुलांच्या मनातील विविध अंधश्रद्धांवर आधारित रोचक कथा आहेत.

‘चेटूकमाऊ’ : काळ्या मांजराबद्दलच्या गैरसमजांवर आधारित
‘ग्रेट गडबडगुंडीची गोष्ट’ : घुबडाविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेवर प्रकाश ‘कापसू आणि मंतरमियाँव’ : भित्र्या सशाच्या कल्पित भीतीवर मात करण्याची कथा या कथांमधून पशु, पक्षी आणि प्राण्यांविषयी असणारे मुलांच्या मनातील गैरसमज दूर होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र यांनी प्रकाशित केले असून त्याचे स्वागतमूल्य रु. १००/- आहे.
ISBN : 978-81-987321-9-4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *