दापोली : संजय कदम यांनी कुटुंबासोबत केलं मतदान

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी सातपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. दापोलीचे शिवसेनेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांनी कुटुंबासोबत केलं मतदान केलं आहे.

दापोलीत सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत आहे. पहिल्या तासामध्ये अगदी 85 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी दिसून आली.

दरम्यान लोकशाहीच्या ह्या सोहळ्यात, मी मतदानाचा हक्क बजावला आहे. तुम्ही पण, आपल्या मतदानाचा हक्क बजावून, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा ! असं आवाहन संजय कदम यांनी केलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात १७४७ मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसं संघात 13 लाख 39 हजार 697 मतदार आहेत. पुरुष – 6 लाख 46 हजार 176 तर महिला मतदार 6 लाख 93 हजार 510,

रत्नागिरी,राजापूर,दापोली,गुहागर आणि चिपळूण असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चार ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *