Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : नदीवरील अर्धा पूल वाहूनगेल्याने ग्रामस्थांचे हाल

banner 468x60

दापोली तालुक्यातील बुरोंडी गावातील नदीवरील पुलाचा अर्धा भाग मुसळधार पावसामुळे पुराच्या प्रवाहात वाहून गेला आहे. हा पूल दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. अर्धा पूल वाहून गेल्याने नागरिक विशेषतः महिला, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

banner 728x90 banner 728x90

बुरोंडी व आसपासच्या गावांना जोडणारा हा पूल पावसाळ्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या पूल नसल्याने नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या पुलासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी निधी मंजूर करून काम सुरू केले होते.

मात्र हा पूल बंधारा टाईप पद्धतीचा असल्याने त्याच्या टिकाऊपणाबाबत गावकऱ्यांकडून शंका व्यक्त होत आहेत. पूल पुरात वाहून गेल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.
गावकऱ्यांनी या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *