दापोली : रानभाज्यांना मिळणार पंचतारांकित चव, जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई राहणार उपस्थित

banner 468x60

दापोली येथील रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे रानभाज्यांचे रानमाया हे नाविन्यपूर्ण आणि अनोखे प्रदर्शन शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

banner 728x90


यामध्ये रानभाज्यांच्या नावीन्यपूर्ण आणि आरोग्यदायी पाककृती बनवल्या जात असून या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या जातात. कोकणामध्ये आढळणाऱ्या भारंगी, टाकळा,कुर्डू करटोली, चिचार्डी , चूच, प्याव, दार, मायाळू, तेरी, अळू, कोवळा बांबू, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, खापरफूटी, आघाडा, काटेमाट , चिवळ, घोळभाजी, आंबाडी, सुरण, उंबर इत्यादी भाज्यांपासून बनवलेल्या पाककृतींचा समावेश असणार आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरी येथील प्रगतशील युवा शेतकरी आणि जॅकफ्रुट किंग मिथिलेश देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या अनोख्या प्रदर्शनाला उपस्थित राहून, नावीन्यपूर्ण पाककृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत करण्यात आले आहे.


स्थळ- रामराजे महाविद्यालय, दापोली
या कार्यक्रमाला रत्नागिरी येथील प्रगतशील युवा शेतकरी आणि जॅकफ्रुट किंग मिथिलेश देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तरी आपण या अनोख्या प्रदर्शनाला उपस्थित राहून, नावीन्यपूर्ण पाककृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत करण्यात आले आहे.
स्थळ- रामराजे महाविद्यालय, दापोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *