दापोली : रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएससीबोर्डचा दहावीचा 100 टक्के निकाल

banner 468x60

नुकत्याच सीबीएससी बोर्ड अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये ब्रिलिएंट करियर अकॅडमी संचालित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, कु. प्रज्वल पवार याने ९४.२०% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

तसेच कु. मधुरा चौधरी हिने ८८.५०% द्वितीय, तर कु. मारूफ मुकादम याने ८५% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ०३ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, तसेच ५ विद्यार्थी तृतीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, संस्थेचे संचालक संदीप राजपुरे, संदीप खोचरे , संदीप सावंत, उमेश वैशंपायन , मुख्य प्रशासक प्रा. कुणाल मंडलिक , मुख्याध्यापक शेखर पाटील, दिपक पवार , समन्वयक नेहा बर्वे, अफरीन घनसार, अरविंद मांडवकर, तबस्सुम मुकादम, मृणाली पराते यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *