दापोली : धक्कादायक, अल्पवयीन मुलीला शितपेयातून गुंगीचे औषध, चिपळूण, गुहागर, मुरुड रूमवर लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अझहर कडवईकरला अटक

banner 468x60

दापोलीला हादरवणारी घटना समोर आली आहे. राज्यात एकीकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दापोलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

banner 728x90

दापोलीतील अझहर कडवईकर याने समाजमाध्यमाद्वारे दापोलीतील एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून चिपळूणमधील फार्म हाउसमध्ये नेवून तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देवून तिच्यावर अत्याचार केले आहेत.

तिचे अश्लील फोटो काढून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकी देवून तिच्याशी वारंवार शरिरसंबंध ठेवण्यात आले. दरम्यान तिला मारण्याची धमकी देखील देणार आली आहे. अल्पवयीन मुलीवर एप्रिल २०२२ मध्ये चिपळूण येथील एका फार्महाउस अत्याचार करण्यात आले असून अत्याचार करताना अझहर कडवईकर याने व्हिडिओ आणि फोटो काढले होते.


याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील एका मुलीला ती अल्पवयीन असताना तिच्याशी समाजमाध्यमाद्वारे ओळख करून घेवून चिपळूण येथील संशयित अझहर कडवईकर याने मैत्री केली. या मैत्रीमधून तो या मुलीला एप्रिल २०२२ मध्ये चिपळूण येथील एका फार्महाउस वर घेवून गेला व तेथे तिला शीतपेय पिण्यास दिले.

ते या मुलीने प्यायले त्यानंतर या मुलीला गरगरू लागले. त्याचा फायदा घेवून त्याने या मुलीशी त्याने शरीरसंबध केले व त्याचे फोटोही काढले. त्यानंतर अझहर याने या मुलीला हे फोटो समाजमाध्यमावर टाकेन अशी धमकी देवून तिला गुहागर व मुरुड येथील लॉजवर नेवून तिच्याशी अतिप्रसंग केला.

समाजमाध्यमावर ओळख झाली तेव्हा अझहर कडवईकर याने वेगळेच नाव सांगितले होते. मात्र या मुलीला त्याचे खरे नाव समजताच तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला.

तेव्हा अझहर कडवईकर याने त्याच्याशी लग्न कर असा तगादा लावला मात्र या मुलीने त्यासाठी नकार दिल्याने त्याने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली अखेर या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात जावून अझहर विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संशयित अझहर कडवळकर याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या विविध कलमानुसार तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला प्रथम पोलीस कोठडी देण्यात आली व ती संपल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.

या मुलीने तक्रारीत संशयिताचे नाव अझहर कडवळकर असे दिले होते मात्र तपासात ते अझहर कडवईकर असे निष्पन्न झाले असल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *