Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाजपंढरी येथे घडली. दापोली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भरत चुनेकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाजपंढरी, ता. दापोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90


या प्रकरणी दिपक अशोक खेडेकर (वय ५० वर्षे, व्यवसाय व्यापारी, रा. हर्णे, जुनी ब्राम्हणआळी, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी दिपक खेडेकर यांनी काही काळापूर्वी आरोपी भरत चुनेकर याला काही रक्कम उसने दिली होती. ती रक्कम परत मागण्यासाठी ते १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास पाजपंढरी येथील आरोपीच्या घरी गेले.


तेथे झालेल्या चर्चेदरम्यान आरोपीने पैशाची मागणी केल्याचा राग मनात धरला आणि संतापाच्या भरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “भडव्या, येथून चालू पड” अशा अश्लील शब्दांत आरोपीने खेडेकर यांना दमदाटी केली. एवढ्यावरच तो थांबला नाही; तर घरातून काठी उचलून खेडेकर यांच्यावर हल्ला चढवला.


या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि डाव्या मांडीवर जखमा झाल्या. घटनेनंतर जखमी खेडेकर यांनी तत्काळ दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रात्री १२:५६ वाजता तक्रार नोंदवली.


दापोली पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गु.र. क्र. १९०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) प्रमाणे आरोपी भरत चुनेकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, लवकरच त्याला ताब्यात घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *