दापोली : “या” गावात दोन गटात तुफान राडा, दगडफेक आणि हाणामारी

Screenshot

banner 468x60

दापोली येथील अडखळ येथे दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. अडखळ तरीबंदर येथे बसण्याच्या जागेवरून आणि डंपर लावण्यावरून सायंकाळी दोन गटात जोरदार हाणामारी पाहायला मिळाली आहे.


banner 728x90

🪀📌🅾️ कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक

https://chat.whatsapp.com/CtcDHrY9Kp469qVwLPEqRH

अडखळमधील एका तरुणाने पार्किंगमध्ये लावलेल्या एका गाडीचा फोटो काढला यावरून अडखळ मोहल्लामधील एकाने हा फोटो का काढला अस विचारलं त्यानंतर एका बाजूने जोरदार दगडफेक झाली यानंतर दोन्ही बाजूने ही दगडफेक केली आहे. हा जागेचा वाद असल्याचं बोललं जात आहे.

हा वाद डंपर लावण्याच्या प्रकरणावरून झाला असून यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. हा राडा इतका मोठा झाला असून यामध्ये दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली.

दरम्यान पाजपंढरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोहल्ला येथे जाऊन त्यांनी देखील दगडफेक केली आहे. या दगडफेकीमध्ये काहीजण जखमी देखील झाले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन्ही बाजूकडून मोठा जमाव देखील जमा झाल्याचे व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागले आहेत.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना शांत केलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होतं. रात्री उशिरा आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.


दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राजापूर येथे देखील शिमग्याच्या पालखी वरून दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळत आहे. राजापूर मध्ये देखील वातावरण तापले असून मोठा जमाव एकत्र झाल्याची माहिती मिळत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *