दापोली : आपत्ती व्यवस्थापनासाठी दापोली पोलीस दल सज्ज

banner 468x60

दापोली सध्या अतिवृष्टी सुरू असून कोणत्याही क्षणी आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू शकते. याच पार्श्वभूमीवर दापोली पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी दिली आहे.


पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ मदतकार्य सुरू करता यावे यासाठी दापोली पोलीस ठाण्याकडे रबरी बोट, लाइफ जॅकेट, रस्सी, कुदळ, फावडे, बॅटरी, स्ट्रेचर आदी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे.


पोलीस दल कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी तत्पर असल्याचे तोरसकर यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी सतर्क राहून प्रसंगी थेट दापोली पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *