दापोली : राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली वाकवली आदर्श प्राथमिक शाळा

banner 468x60

केंद्र शासनाच्या पीएमश्री शाळा योजनेअंतर्गत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वाकवली गावातील जि. प. ची आदर्श प्राथमिक शाळा वाकवली नंबर 1 ही पहिली ते चौथी या शाळेची निवड झाली आहे. या शाळेला ब्रिटिशकालीन इतिहास लाभला असून 1896 साली ही शाळा स्थापन झाली.

banner 728x90

आजवर अनेक मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेतल आहे. अद्ययावत डिजिटल क्लास रूम पासून,शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा व अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.


देशातील सर्वोत्तम पीएम श्री शाळा २९ जुलै २०२५ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अखिल भारतीय समग्र शिक्षा अभियान उपक्रमाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्री शिक्षण यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील या शाळेची राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी निवड झाल्याच पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून सोमवारी सायंकाळी मिळाले आहे.

ऑनलाइन पद्धतीने होणार्‍या पारितोषिक वितरण समारंभाला डॉ. सुकांता मजुमदार शिक्षण राज्यमंत्री, जयंत चौधरी शिक्षण आणि स्वतंत्र प्रभार, एमएसडीई, पियुष गोयल माननीय संसद सदस्य, योगेश सागर विधिमंडळ सदस्य हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पी. एम. श्री. आदर्श शाळा या उपक्रमासाठी जिल्ह्यातून सोळा शाळा निवडल्या गेल्या होत्या. त्यातून जिल्ह्यातील लांजा, झरेवाडी तसेच वाकवली या तीन प्राथमिक शाळांची निवड राज्यस्तरावर करण्यात आली.

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या या उपक्रमाच्या अंतिम स्पर्ध तीनही शाळांमधून प्रश्नावलीच्या स्पर्धेत तसेच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात या शाळेने बाजी मारली आहे. ब्रिटिश कालीन असलेली शाळा ही पूर्वी सुतार शाळा म्हणून प्रसिद्ध होती कौशल्यपूर्ण शिक्षण हेच या शाळेत ब्रिटिश काळातही देण्यात येत होते. इंटरनेट सुविधा,सीसीटीव्ही कॅमेरेही असलेली शाळा आहे
सरकारी शाळा दर्जेदार व त्यांचा सर्वांगीण विकास, मुलांचे शारीरिक व बौद्धिक विकास, देशाचे इतिहास गौरवशाली बाबी यांची ओळख.

ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणे,कार्य कुशलता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, सामाजिक स्तरावर सरकारी शाळांविषयी जनजागृती निर्माण करणे.जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण देणे तसंच सगळ्यात महत्त्वाचं असलेलं अद्ययावत असं ग्रंथालय, सोलर पॅनल,सेल्फी पॉईंट, योगा शिबिर, आर्थिक साक्षरता उपक्रम, आरोग्य शिबिर, गेस्ट लेक्चर ही या शाळेची वैशिष्ट्य ठरली आहेत.

पालक व ग्रामस्थ यांचा महत्त्वाचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला असून कोकणाच्या ग्रामीण भागातील ही सुसज्ज असलेली शाळा ठरली आहे. एकंदर 39 स्वरूपाचे निकष असलेले मुद्दे यासाठी विचार करण्यात आले होते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आमच्या ग्रामीण भागातील शाळेची निवड झाल्याने आम्हाला आनंद आहे.

आम्ही गावात प्राथमिक शाळेलाच प्राधान्य देतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून मुख्याध्यापक, शिक्षक व आम्ही कार्यरत असतो अशी प्रतिक्रिया शालेय समितीचे अध्यक्ष दुर्गेश जाधव यांनी दिली.


या उपक्रमात मिळवलेल्या मोठ्या यशाबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक जावेद शेख, शिक्षिका निवेदिता सागर आदी ग्रामस्थांचं कौतुक करण्यात येत आहे. या मतदारसंघाचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, दापोली तालुका गटशिक्षणाधिकारी,श्री. सांगडे विविध मान्यवरांनी यांनीही या शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांचे, ग्रामस्थांच, विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केल आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *