दापोली : नॅशनल हायस्कूल दापोली मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सिराज रखांगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

दापोली : नॅशनल हायस्कूल दापोली मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सिराज रखांगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

banner 468x60

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक(इ 5वी)व पूर्व माध्यमिक(8वी) शिष्यवृत्तीपरीक्षेत नॅशनल हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यात पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत एक तर पूर्व माध्यमिक परीक्षेत दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व विविध बक्षिसे देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक ही उपस्थित होते.

banner 728x90

यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक गटात मोहम्मद सुफियान मोहम्मद मुस्तफा याने शहरी खुल्या गटांमध्ये तालुकास्तरावर 4 थे व जिल्हा स्तरावर 114 स्थान तर पूर्व माध्यमिक मध्ये कुमारी शिफा जमीर चिपळूणकर हिने तालुकास्तरावर 2 रे व जिल्हा स्तरावर 39 वे स्थान तर कुमारी जिया जमीर जमादार हिने तालुकास्तरावर 4 थे व जिल्हा स्तरावर 58 वे स्थान पटकावले होते.

तत्पूर्वी जिया जमादर ही इयत्ता पाचवीमध्येही शिष्यवृत्तीस पात्र ठरली होती व आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती साठीही ती पात्र ठरली आहे.

प्रशालेतील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती व एन एम एम एस परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार यांनी समाधान व्यक्त करत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन करत असेच निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा दिली.

प्रशालेत शाळा स्तरावरील विविध स्पर्धांची उत्तम प्रकारे तयारी करून घेतली जाते, विद्यार्थ्यांचा भरपूर सराव व जादा तासिकांचे आयोजन केले जाते असे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला सरांनी सांगितले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष सिराज रखांगे, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन आदि पदाधिकाऱ्यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *