नॅशनल हायस्कूल, दापोलीचे प्रशासन चालवणाऱ्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नझीर इब्राहिम पठाण यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पठाण यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल त्यांचे पठाण आणि मुकादम फॅमिलीकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. नझीर इब्राहिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली संस्था शिक्षण क्षेत्रात नवीन उंची गाठेल, असा विश्वास दोन्ही कुटुंबांनी व्यक्त केला आहे.
यासोबतच, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण नवीन कार्यकारिणीलाही त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नवीन कमिटी दापोलीतील शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शैक्षणिक विकास आणि संस्थेच्या प्रगतीसाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचे आणि संपूर्ण कमिटीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















