दापोली : नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराधक्ष विराजमान, नगराधक्षपदी कृपा घाग यांची बिनविरोध निवड

banner 468x60

गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेल्या आणि नाट्यपूर्ण घडामोडी घडलेल्या दापोली नगरपंचायत नगराधक्ष पदाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराधक्ष विराजमान झाला असून दापोली नगरपंच्यायतीच्या नगराधक्षपदी कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे.

banner 728x90 banner 728x90

दापोलीच्या स्थानिक राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ममता मोरे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत होता. हा संघर्ष आता शिंदे गटाच्या विजयाने संपुष्टात आल्याचे दिसते. ममता मोरे यांना नगराध्यक्ष पदावरून हटवण्यात शिंदे गटाला यश आले असून, यामुळे दापोलीच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

सध्या दापोली नगरपंचायतीत 16 नगरसेवक महायुतीच्या बाजूने आहेत, ज्यामध्ये 14 शिवसेना (शिंदे गट), 1 भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. या संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने हा राजकीय विजय मिळवला आहे.

उद्धव ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर पुन्हा संघटित होण्याचे आव्हान आहे. दापोलीच्या जनतेला आता प्रशासकीय स्थिरता आणि विकासकामांची गती यावर लक्ष केंद्रित करणारा नेतृत्व हवा आहे. नवीन नगराध्यक्षाची निवड ही या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *