दापोली : मुसळधार पावसामुळे फणसू–भडवले मार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प 

banner 468x60

मुसळधार पावसामुळे फणसू–भडवले मार्ग पाण्याखाली गेलं आहे. दापोली तालुक्यातील फणसू–भडवले मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णपणे जलमय झाला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Kokan rain update whatsap join link https://chat.whatsapp.com/JFL3JLkJiIZHvADEKhWtCI?mode=ac_t

banner 728x90

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नद्या–नाले तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुराचे पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

पूरस्थितीचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासन सतर्क असून मदत व बचाव यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *