दापोली : आमदार योगेश कदमांना राज्यमंत्रीपद मिळणार सूत्र – कोकण कट्टा न्यूज

banner 468x60

आमदार योगेश कदम यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र आता एक अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी कोकण कट्टा न्यूजच्या हाती लागली आहे. शिवसेनेला ९ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रीपद मिळणार आहेत. शनिवारी मुंबईतील राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडेल.

त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदाची संधी मिळणार, याची माहिती समोर आली आहे. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार उद्या किंवा परवा दुपारनंतर संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. शिवसनेच्या ३ राज्यमंत्रीपदात योगेश कदम यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी याबाबत आमदार योगेश कदम यांच्याजवळ संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकलं नाही आम्ही प्रतिक्रिया घेण्याचं प्रयत्न करू

त्यामुळे दापोलीला एक राज्यमंत्रीपद मिळणार असून रत्नागिरी जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळणार आहे उदय सामंत यांचं नाव मंत्री म्हणून निश्चित झालं आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.

यात शिवसेनेचे 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे सरकारमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांचा समावेश आहे. तर ज्या आमदारांचं नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी फिक्स होतं. मात्र मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने जे आमदार मंत्री होऊ शकले नाहीत.

त्यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.हे सगळेजण उद्या राजभवनात होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या सगळ्यांच्या वाट्याला कोणती खाती येणार, हे बघावे लागेल.

शिवसेना दिल्लीतून शिक्कामोर्तब झालेल्या मंत्र्याची नावं, शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री

गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
शंभूराजे देसाई
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
भरत गोगावले
आशिष जयस्वाल

शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री

योगेश कदम
विजय शिवतारे
राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *