दापोली तालुक्यातील केळशी व मांदिवली सजा अतिरिक्त कार्यभार असलेले ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी राजेंद्र उंडे याला 20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले होते.
त्याच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र उंडे याने उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर मजकूर भरून देऊन स्वाक्षरी देण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागणी केली होती.
मागणी केलेली रक्कम 10 जून रोजी दापोली येथे स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार लाच स्वीकारल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाणेत राजेंद्र उंडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023चे कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारणा सन 2018)चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













