दापोली – खेड मार्ग बंद, खेड दापोली वाहतूक बंद, खेड दापोली प्रवास टाळा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने रविवारीही रत्नागिरी जिल्ह्यात धूमाकूळ घातला आहे.

kokan rain Update News Join whatsap kokan katta news

banner 728x90

https://chat.whatsapp.com/GcWatBPR9HN5HBMUsjHVuW

दापोली खेड चिपळूण भागात देखील मुसळधार पाऊस आहे याचा फटका दापोली – खेड मार्गाला बसला असून दापोली खेड मार्ग आज बंद आहे. या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गाचे गेले काही महिने काम सुरू आहे.

याच मार्गावर खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळ पुलाचे काम सुरू असून, त्यासाठी पर्यायी मार्ग करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दापोली- खेड मार्गावरील वाहतूक आता दस्तुरीवरून पालगडमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे दापोली खेड प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलं आहे. जोपर्यंत पावसाचा जोर ओसरत नाही त्यामुळे मार्ग सध्या सुरु न होण्याची चिन्ह आहेत.

हवामानासंबंधी सर्व माहिती आपण कोकण कट्टा न्यूजच्या व्हाट्सअप youtube आणि वेबसाइटवर पाहू शकता

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *