दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोडवर बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने स्कोडा रॅपिड गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी हर्णे सागरी पोलिसांनी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
आकाश अशोक चव्हाण (१९, रा. मुरुड, ता. दापोली) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (एम.एच.०६ बी.डब्ल ५१६०) भरधाव वेगाने चालवत होता.
हर्णे बायपास रोडवर, अगस्त्य हॉटेलजवळ त्याने समोरून येणाऱ्या श्रुती लक्ष्मण कमठेकर (वय २८, रा. मीरा रोड ईस्ट, ठाणे) यांच्या ताब्यातील स्कोडा रॅपिड वाहन (क्र.एम.एच.०२ सी.पी. ७३५९) याला जोरदार धडक दिली.
या अपघातात स्कोडा रॅपिडमधील चार प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये श्रुती लक्ष्मण कमठेकर (वय २८, रा. मुंबई), नील शिरवाडकर (वय १७, रा. नवी मुंबई), अदिती जय नागवेकर (वय १५, रा. श्रीवर्धन, जि. रायगड) आणि जुही नागवेकर (वय २२, रा. श्रीवर्धन, जि. रायगड) यांचा समावेश आहे. अपघातानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची नोंद दिनांक ११/०६/२०२५ रोजी सायंकाळी ७.३७ वाजता हर्णे सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बोलेरो चालक आकाश अशोक चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*