दापोली : हर्णे किनाऱ्यावर आढळला ‘अंबरग्रीस’सदृश पदार्थ; ‘समुद्रातील सुवर्ण’ म्हणून ओळखली जाणारी व्हेल उलटी असल्याचा कयास

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आल्याची माहिती मिळाली. सदर संशयास्पद वस्तू वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ताब्यात घेतली असून, पुढील तपासणीसाठी नागपूर येथील वनविभागाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

banner 728x90

हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी निसर्ग हॉटेलसमोरील समुद्रकिनारी असलेल्या दगडामध्ये हा पदार्थ अडकलेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत लेखी माहिती दिली.


सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. निरीक्षणात हा पदार्थ दगडात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावर वाळू मोठ्या प्रमाणात चिकटलेली होती. त्यामुळे तो प्रथम स्वच्छ धुतला गेला आणि नंतर पंचनामा करून अधिकृतरीत्या वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.


वनअधिकाऱ्यांनी प्राथमिक निरीक्षणात हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असण्याची शक्यता व्यक्त केली असली, तरी याबाबत अद्याप निश्चितता नाही. त्यामुळे पदार्थाचा वैज्ञानिक तपास केला जाणार आहे, असे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *