Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पडला पार

banner 468x60

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, शाखा दापोली यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा – सन २०२५” हा भव्य कार्यक्रम रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री मंगल कार्यालय, दापोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका नेते नितीन अर्जुन बांद्रे यांनी भूषवले, तर विविध मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

banner 728x90 banner 728x90


या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गायकवाड, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष सुनिल कारखेले, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ डवरी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भोपे, जिल्हा महिला प्रतिनिधी विश्रांती शेळके फडतरे, तसेच प्रवीण काटकर, रमाकांत शिगवण, बळीराम राठोड यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


कार्यक्रमात दापोली तालुक्यातील विविध शाळांमधील ४ थी आणि ५ वी शिष्यवृत्तीधारक, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी, ८ वी शिष्यवृत्तीधारक आणि ८ वी RTS गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच मार्गदर्शक शिक्षक आणि शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या हक्कांसह कर्तव्याची जाणीव ठेवत आधुनिक युगातील AI तंत्रज्ञानावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, ज्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


तालुकाध्यक्ष भालचंद्र घुले यांनी प्रास्ताविकात शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि जुन्या पेन्शन हक्कासाठी संघटनेची भूमिका याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता मडीवाळ आणि गीता पाध्ये यांनी केले, तर सचिव स्वप्निल परकाळे यांनी आभार प्रदर्शन केले.


हा कार्यक्रम संघटनेच्या कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. यशस्वी आयोजनासाठी मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *