Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

दापोली : गुरांच्या वादातून कोयत्याने हल्ला, विश्वास महाडिकवर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुर्डी येथे गुरांच्या वादातून
एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल, बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एकनाथ जगन्नाथ राऊत (वय ३९, रा. मुर्डी तेलेवाडी, दापोली) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा एक दात पडला आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणी विश्वास रामचंद्र महाडिक (रा. आंजले कातळकोंड, दापोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ राऊत हे मुर्डी येथील नवखंडा शेतात आपली गुरे चरवत होते. त्यावेळी त्यांनी गुरे हाकलण्यासाठी हातात असलेली काठी हलवली. याच गोष्टीचा गैरसमज करून घेत आरोपी विश्वास महाडिक याने एकनाथ राऊत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, विश्वास महाडिकने राऊत यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात एकनाथ राऊत यांच्या डाव्या हाताचे मनगट, डोके आणि हनुवटीला दुखापत झाली असून, त्यांचा एक दातही पडला आहे. घटनेनंतर जखमी राऊत यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.


दापोली पोलिसांनी या प्रकरणी काल रात्री ७.४२ वाजता गु.र.नं. १३१/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास सुरू आहे. गुरांच्या क्षुल्लक वादातून थेट कोयत्याने हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *