दापोली : फराज रखांगे यांच्याकडे जेसीआयच्या दहाव्या अध्यक्षपदाची सूत्रे

banner 468x60

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांच्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल दापोली शाखेचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी दहाव्या अध्यक्षपदाची शपथ जेसी फराज रखांगे यांनी ग्रहण केली. या कार्यक्रमास डॉ जयवंत जालगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून , गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, तर माजी विभागीय अध्यक्ष जेएफडी अतुल गोंदकर, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते,

मावळते अध्यक्ष जेसी. रित्विक बापट यांनी गतवर्षीच्या उपक्रमांचा आढावा घेत वार्षिक अहवाल सादर केला, तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या जेसी सदस्यांचा सन्मान देखील सन्मानचिन्ह देऊन करण्यात केला.

जेसी. फराज रखांगे यांनी येत्या काळामध्ये समाजातील गरजू व्यक्तींसाठी विशेष काम करणार असल्याचे स्पष्ट करत शाश्वत कामांवर आपला भर असेल असे नमूद केले.

कार्यक्रमास जेसी सदस्य तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसी तेजस मेहता यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *