Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील फणसू गावातील १६ वर्षीय मनस्वी महेश बेर्डे हिचा दुचाकी अपघातानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

banner 728x90 banner 728x90

ही हृदयद्रावक घटना 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी घडली असून, 27 जुलै रोजी मुंबईत तिच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मनस्वी ही आपल्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत एमएच 03 ईडी 4668 क्रमांकाच्या ऍक्टिवा दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडीवरून खाली पडली. अपघातात तिच्या मांडीला, पायाला, गुडघ्याला आणि पोटाला गंभीर मार लागला. प्राथमिक उपचारासाठी तिला तातडीने दापोलीतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं.

तेथून पुढील उपचारासाठी म्हात्रे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू असताना, 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6.50 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या अपघातानंतर सुरू झालेली उपचारांची शर्थ अखेर निष्फळ ठरली.

या प्रकरणी मनस्वीच्या अपघाती मृत्यूची नोंद 31 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6.57 वाजता दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे फणसूर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *