दापोली : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा संपन्न

banner 468x60

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि 27 जुलै रविवारी फाटक कॅपिटल शुभारंभ हॉल येथे भव्य तालुकास्तरीय पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोलीचे तालुका अध्यक्ष जयवंत जालगावकर नीता जालगावकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन महिला अध्यक्षा साधना बोत्रे, प्रीती जैन, रमा बेलोसे, विनिता शिगवण, मेघा खटावकर, अक्षता साळवी, शितल आंबेकर, प्रिया पवार, अमिता तलाठी, भाग्यश्री फंसाळकर, शमिका मोरे, प्रभा गुरव, प्रियांका कर्देकर वैदेही महाडिक आणि तालुक्यातील मोठया संख्येने महिला उपस्तिथ होत्या.

banner 728x90

कार्यक्रमचं सूत्रसंचालन कुणाल मंडलिक यांनी केले.
दापोली तालुक्यातील 107 महिला स्पर्धाकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या पाककला स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे कंदमूळापासून पाककला बनवायचं आव्हान महिलांसाठी होते.

अतिशय सुंदर असे वेगवेगळे पदार्थ महिलांनी बनवून आणले होते महिलांसाठी एक जणू व्यासपीठाच निर्माण झालं होतं. सर्व सहभागी महिलांना एक आकर्षक गिफ्ट देण्यात आला. या स्पर्धेमधील विजेते खालील प्रमाणे आहेत. खालील विजेत्या स्पर्धकांना आठ हजार पाच हजार तीन हजार दोन हजार अशी बक्षिसे देण्यात आली.


स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक
दिव्या कोठारी केळशी
द्वितीय क्रमांक
सुप्रिया सुनील बर्जे

तृतीय क्रमांक
सौ ज्योती दिपक जाधव
उतेजनार्थ
दिपिका लखमदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *