दापोली : दापोलीच्या चरस तस्करला शिळफाटा मुंब्रा येथे पकडलं , 1.10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

दापोलीच्या चरस तस्करला ठाण्यात पकडलं असून 1.10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (वय २९, रा. दापोली) असे अटक केलीया संशयिताचे नाव आहे.


चरस या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दापोली (जि. रत्नागिरी) येथील एकाला ठाणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे सुमारे १ किल्लो १०६ ग्रॅम वजनाचा चरस व इतर वस्तू असा एकुण १ कोटी १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


कारण चरस हा अंमली पदार्थ विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो. मसुद येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात शिळफाटाकडून मुंब्रा बाजुकडे मसुद जात होता. तेथील वाहिनीवरील हावरे सिटी नवीन बांधकामाच्या समोरील सार्वजनिक रोड, शिळफाटा येथे ठाणे पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे उघड झाले.

त्याच्याकडून १ किलो १०६ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ व इतर वस्तू असा एकुण १ कोटी १० लाख ८० हजार, ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मसुद ऐनरकर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील अपणानगर, खोंडा येथे राहायला आहे.

पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकाराबाबत मसुद ऐनरकर याचे विरुध्द शिळ डायघर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब) (प) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहे. संशयित आरोपीने चरस हा अंमली पदार्थ कोणाकडुन आणला? याबाबत तपास चालु आहे.

तसेच चरस हा अंमली पदार्थ विदेशातुन भारत देशात तस्करी करून आणण्यात आला असण्याची शक्यता आहे. गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता असुन त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *