Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : दापोली-दाभोळ मार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

दापोली-दाभोळ मार्गावर उंबरले मराठी शाळेजवळ १६ मे रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास एका दुचाकीच्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला.

banner 728x90 banner 728x90

या प्रकरणी दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋतिक लक्ष्मण गुरव (वय २३, रा. आगरवायगंणी, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र रामचंद्र रसाळ (वय ४७, व्यवसाय-नोकरी, रा. उंबळे गाववाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांचे वडील रामचंद्र सखाराम रसाळ हे १६ मे रोजी सकाळी शेतावर कामासाठी पायी चालले होते. त्याचवेळी दापोलीकडून दाभोळकडे जाणारी एमएच ०५ एयू ४७८४ क्रमांकाची यामा कंपनीची एफझेडएस दुचाकी भरधाव वेगात आली आणि तिने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रामचंद्र रसाळ यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात रामचंद्र रसाळ यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी रवींद्र रसाळ यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दुचाकीस्वार ऋतिक लक्ष्मण गुरव (वय २३, रा. आगरवावगंणी, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), १२५ (ए), १२५ (बी), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *