दापोली : दहागाव मार्गावर बसची दुचाकीला धडक; दोघे जखमी

banner 468x60

दापोली-दहागाव रस्त्यावर पिसई येथील महामाही मंदिराच्याजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेला भाऊ, असे दोघे जखमी झाले.

ही घटना ०४ मे रोजी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश तुकाराम कुंभार (वय ५०) हे त्यांची मोटारसायकल (एमएच ०८ बीएफ २८७५) वर त्यांचे भाऊ प्रवीण यांना मागे बसवून दहागावच्या दिशेने दापोलीकडे येत होते.

पिसई येथील महामाही मंदिराच्याजवळ वळणावर असताना समोरून येणाऱ्या एसटी बस (एमएच १४ बीटी २०९८) च्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली.


या अपघातात रुपेश कुंभार यांच्या उजव्या पायाच्या तळव्याला आणि घोट्याला मार लागून दुखापत झाली आहे. तसेच, त्यांच्या मागे बसलेले त्यांचे भाऊ प्रवीण यांनाही दुखापत झाली आहे.

याप्रकरणी रुपेश कुंभार यांनी दापोली पोलीस ठाण्यात एसटी बस चालक विजय बाळाजी राख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *