भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय सावंत यांचे शिवसेनेत स्वागत करताना रामदास कदम यांनी त्यांना पक्षवाढीसाठी काम करण्याचे आवाहन केले. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद रत्नागिरी जिल्ह्यात वाढणार असल्याचा दावा पक्षनेत्यांनी केला.

संजय सावंत हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत असल्याने त्यांच्या पक्षत्यागामुळे भाजपला स्थानिक पातळीवर धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेषतः दापोली आणि आसपासच्या भागात त्यांचा कार्यकर्ता वर्ग असल्यामुळे आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा दापोली तालुक्यात वाढता प्रभावही चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक विकासकामे, प्रशासनावर असलेली पकड आणि कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद मजबूत होत असल्याचे दिसून येते.
या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना आपला जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नात असून, भाजपसमोर नवीन आव्हान उभे राहू शकते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













