दापोली : बेल्टने मारहाण, चटके, जाळलं, प्रॉपर्टीसाठी वफाला छळलं, अंगावर काटा आणणारी अनाथ वफा चिपळूणकर यांची दर्दनाक कहानी

banner 468x60

ही सर्व कहानी आहे दापोलीतील नशेमन कॉलनीत राहणाऱ्या अवघ्या 21 वर्षाच्या वफा मुदस्सीर चिपळूणकर यांची. वफा या अनाथ आहेत.

वफा यांचे वडील इकबाल खान यांचा 2021 मध्ये मृत्यू झाला. 3 महिन्यानंतर पुढे वफा यांच्या आई जरीना खान यांचा मृत्यू झाला. २२ नोव्हेंबर २०२३ ला वफा यांचा मुदस्सीर शहाबुद्दीन चिपळूणकर यांच्याजवळ लग्न झालं.

banner 728x90

पण पुढे वफाच्या आयुष्यात झालं ते दर्दनाक आहे.दरम्यान हा प्रकार दापोलीतील नशेमन कॉलनी येथे घडला आहे. वफा यांच्या तक्रारीनुसार मुदस्सीर शहाबुद्दीन चिपळुणकर, शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर, फिरोजा शहाबुद्दीन चिपळुणकर, सबा शहाबुद्दिन चिपळुणकर यांच्याविरोधात दापोली पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

बेल्टने मारहाण, छळ, चटके, प्रॉपर्टीसाठी वफाला छळलं 19 वर्षात लग्न 21 वर्षाच्या वफा चिपळूणकर यांची अंगावर काटा आणणारी दर्दनाक कहानी पाहुयात

वफा चिपळूणकर यांनी दापोली पोलिसात चिपळूणकर कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अवघ्या २१ वर्षात मी सर्व सहन केलं असं दुसरं कोणासोबतही होऊ नये यासाठी प्रशासनाने मला मदत करावी आणि मला जगण्याची उमेद मिळावी आणि मला त्रास दिलेल्या चिपळूणकर कुटुंबियांवर कोठारात कठोर कारवाई करण्याची मागणी वफा यांनी केलीय दरम्यान दापोली पोलीस आणि राज्य महिला आयोग आणि रत्नागिरी प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागेल,

Story By – तेजस बोरघरे आणि सलीम रखांगे, दापोली

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *