दापोली : किरकोळ कारणावरून मारहाण

banner 468x60

दापोली तालुक्यातील पालगड येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण करत गाडीचे नुकसान केल्याची घटना ३१ डिसेंबरला रात्री घडली.

banner 728x90

दापोली पोलिस ठाण्यात या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरला एस. राजकुमार (४२ रा. तामिळनाडू) हा चालक शमनाद के. पी. याच्यासोबत ट्रक घेऊन अलिबाग रायगड येथून दापोली-हर्णे येथे जात होता.

पालगड दापोली येथे ट्रकच्या मागून एक काळ्या रंगाची मोटार वेगाने आली. त्यातील एकाने ट्रकपुढे येऊन गाडी थांबवली. त्याच्या हातात रॉड होता. त्याने एस. राजकुमार याच्या ट्रकच्या दोन्ही दरवाजाच्या काचा फोडल्या तसेच अन्य दोन मोटार सायकलवरील चौघे ट्रकमध्ये चढून राजकुमार व शमनाद के. पी. याला पाईपने मारहाण केली.

दमदाटी करत गाडी जाळून टाकण्याची धमकी दिली, अशी फिर्याद एस. राजकुमार यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकलेन शौकत हवा (२४, रा. जामगे मोहल्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३१ डिसेंबरला रात्री गाडीतून कामाकरिता महाड येथून परत येत होतो तेव्हा त्याचे मित्र मुनीफ अब्दुल गणी खलपे हवा यांच्या मागोमाग टू व्हीलर घेऊन येत होता.

शीरखल स्टॉपच्या पुढे आल्यावर मच्छीच्या गाडीवरील चालक शमनाथ के. पी. हा मागन जोराने हॉर्न वाजवत होता म्हणून हवा याच मित्र मुनीफ अब्दुल खलपे यांनी रस्त्याच्या बाजूला आपली गाडी लावली. तेव्हा मच्छीच्या गाडीवरील चालक व एस. राजकुमार हे गाडीतून उतरून

मुनीफ खलपे याला गाडीतून कॉलरला पकडून खाली उतरवले व शिवीगाळ करत एस. राजकुमार याने मुनीफ खलपे याच्या डोक्यात टॉमी मारून दुखापत केली, असे हवा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हटले आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *