दापोली : आंजर्ले आणि केळशी समुद्रकिनारी आढळलेल्या बेवारस मृतदेहाबाबत अजूनही विचारणा अथवा तक्रार नाही

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि केळशी समुद्रकिनारी दोन मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना 16 जुलैला समोर आली होती. आंजर्ले समुद्रकिनारी 1 आणि केळशी समुद्रकिनारी 1 असे 2 मृतदेह सापडले होते.

banner 728x90

मात्र आज 15 ते 20 दिवस झाले असून या मृतदेहाबाबत कोणीही विचारणा अथवा तक्रार करण्यासाठी आला नाही त्यामुळे याबाबतची सविस्तर माहिती समोर आली नाहीय. दापोली : आंजर्ले समुद्रकिनारी आढळलेल्या बेवारस मृतदेहाबाबत अजूनही विचारणा नाही


दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी गणपती विसर्जन पॉईंट येथे १६ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याचे पूर्वी वाळूमध्ये एका पुरुष जातीच्या व्यक्तीचे शव सापडले होते. परंतु आजपर्यंत याबाबत कोणीही नातेवाईक ओळख पटविण्यास आले नाहीत. अनोळखी प्रेत सुमारे ४५ ते ५० वर्षे वयाचे (नाव,गाव, पत्ता माहित नाही) हे

दि.१६/०७/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा पूर्वी सुमारास केळशी समुद्र किनारी वाळुमध्ये दापोली ता. दापोली जि रत्नागिरी येथे मिळून आले आहे. सदर अनोळखी मयताच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नाही. एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत सुमारे ४५ ते ५० वर्षे वयाचे, उंची सुमारे ५ फूट ७ इंच असून अंगावर राखाडी रंगाचा हाप टि-शर्ट त्याचे समोरील बाजूस लाल-काळ्या रंगाची पट्टी आहे. उजव्या हातात धातुचे कडे आहे

तर दुसरा मृतदेह प्रेत सुमारे ५० वर्षे वयाचे (नाव, गाव, पत्ता माहित नाही) हे दि.१६/०७/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजताचे पुर्वी आंजर्ले समुद्र किनारी गणपती विसर्जन पाईट जवळ वाळूमध्ये दापोली ता. दापोली जि रत्नागिरी येथे मिळून आले आहे.

अनोळखी पुरूष जातीचे प्रेताचे वर्णन :-

एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत सुमारे ५० वर्षे वयाचे, उंची सुमारे ५ फूट ५ इंच असून अंगावर निळ्या रंगाचा हाप टि-शर्ट, दोन्ही पायाचे पंजे व पायाचे पोटरीचा भाग तसेच हाताची बोटे समुद्रातील जलचर प्राण्यांनी खाल्ले आहेत.

यातील अनोळखी मयताबाबत व त्याचे नातेवाईकबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील मोबाईल/फोनवर संर्पक साधून तपासकामी योग्य ते सहकार्य करावे असे दापोली पोलीस ठाण्याचे वतीने जाहिर अहवान करण्यात येत आहे.
दापोली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश पाटील मोबाईल क्रमांक 9096162588 किंवा दापोली पोलीस स्थानक 02358 282033 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन दापोली पोलिसांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *