Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : अमोल धयाळकर यांचा राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने गौरव

banner 468x60

दापोली येथील उंबर्ले रोहिदास वाडीतील अमोल अशोक धयाळकर यांना जनकल्याण सामाजिक संस्था कोल्हापूर भारत सरकार (ने. यु.के.)संलग्न यांचे मार्फत राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार 2025 प्रदान करुन विशेष गौरव करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या प्रसंगी गौरविण्यात आलं असून अमोल धयाळकर यांनी विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळीवर विजेते पद मिळवून दापोली उंबर्ले गावचे नाव लौकिक केले आहे . नुकत्याच सोलापूर येथे पार पडलेल्या राज्य शस्त्र दांडपट्टा स्पर्धेत सुवर्णपदक पदक मिळवले आहे.

क्रीडा क्षेञातील उल्लेखनीय अशा कामगिरींबद्दल अमोल धयाळकर यांचे मानांकन निश्चित झाले होते.
शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल कोल्हापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मा.आमदार जयंत आसगांवकर, प.पू.महंत सिद्धेश्वर महास्वामीजी,जनकल्याण सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पालक उपस्थित होते.


दापोलीच्या शिरपेचात राज्य क्रीडारत्न पुरस्काराचा मानाचा तुरा रोवून नाव लौकिक केल्याबद्दल लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष- उत्तम पाटील,उपाध्यक्ष-संगम चव्हाण सचिव- सुरेंद्र शिंदे, सहसचिव, शामल आंजर्लेकर,कोषाध्यक्ष-प्रशांत पांदे,सदस्य- रूणाली पवार , राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा पंच कविता शिंदे तसेच ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *